मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैजापूर येथे आगमन

 औरंगाबाद,दि.27(जिमाका)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास वैजापूर येथे हेलिकॉप्टर ने आगमन झाले. येथील योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७६ वा अखंड हरिनाम सप्ताहासाठी श्री. शिंदे येथे आले. येथील संजीवनी अकॅडमीच्या प्रांगणात असलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. तेथे आ. रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. शिंदे हे कार्यक्रम स्थळी रवाना झाले.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा