अंगणवाडी मदतनिसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

 





औरंगाबाद, दि.31(जिमाका)- जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात निवड झालेल्या 106 अंगणवाडी मदतनिसांना जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, महिला बालविकास अधिकारी शिवाजी वने तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा