आयुक्त राज्य सेवा हक्क्‍ आयोग यांचा तपासणी दौरा

 


औरंगाबाद, दि. 28 (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत राज्य सेवा हक्क्‍ आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी सहकार विभागाच्या अधिसूचित सेवांचा दप्तर तपासणी दौरा विभागीय सहकारी संस्था, औरंगाबाद यांचे कार्यालयात नुकताच(दि.24) केला. देवगिरी नागरी सहकारी बँक, प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे आढावा सभा घेण्यात आली. विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था जे.बी.गुट्टे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था श्रीमती. सुरेखा फुपाटे, जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था अनिलकुमार दाबशेडे, उपनिबंधक सहकारी संस्था प्रविण फडणवीस, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, औरंगाबाद विभागातील सहायक निबंधक सहकार अधिकारी श्रेणी-1 या सभेस उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी केले. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था जे.बी.गुट्टे, यांनी मार्गदर्शन केले. तसेच विभागीय उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुपाटे यांनी लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 2022-23 पुरविण्यात आलेल्या सेवांचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले. आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा