माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांच्यासाठी विशेष गौरव पुरस्कार
औरंगाबाद, दि.
28 (जिमाका)- सैनिक कल्याण विभागातर्फे विविध
क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे माजी सैनिक, त्यांचे पाल्य, पत्नी यांना विशेष गौरव
पुरस्कार देण्यात येतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त
खेळाडू, साहित्य, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील विजेते, उद्योजक, संगणक क्षेत्रात
उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अन्य नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कामगिरी
करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या
माजी सैनिकांना, त्यांच्या पाल्य, पत्नीस हे पुरस्कार दिले जातात.राष्ट्रीय स्तरासाठी
10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीयस्तरासाठी 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार असे
या पुरस्काराचे स्वरुप आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह संचालक, सैनिक कल्याण विभाग,
पुणे यांना दि.30 सप्टेंबर पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत.अधिक माहितीसाठी जिल्हा
सैनिक कार्यालय, औरंगाबाद येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
औरंगाबाद यांनी केले आहे.
तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण
झालेल्या सैनिक पाल्यांचे विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे दि.25 सप्टेंबर सायं 4 वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन
जिल्हा सैनिक अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे. संपर्क क्रमांक- 0240-2370313.
00000
Comments
Post a Comment