वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर इमारतीची आवश्यकता

 


औरंगाबाद, दि. 28 (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी  भाडेतत्त्वावर इमारतीची आवश्यकता असल्याचे गृहपाल यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत कार्यरत मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट-4 पद्मपुरा,औरंगाबाद या वसतिगृहाकरीता भाडेतत्वावर  इमारतीची आवश्यकता आहे. औरंगाबाद शहरात एकूण 250 विद्यार्थिनी राहतील मनपा हद्दीत अशी सुसज्ज व वातानुकुलित सोयी-सुविधायुक्त इमारत (एकूण क्षेत्रफळ 30000 स्क्वेअर फूट) पाणी, विज व्यवस्था तसेच शहरातील महाविद्यालयास जाण्या-येण्याचा मार्ग असलेली मध्यवर्ती ठिकाणी असणारी इमारत असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इमारत मालकांनी इमारतीच्या सर्व दस्ताऐवजासह सहायक आयुक्त समाज कल्याण, न्याय भवन, खोकडपुरा औरंगाबाद किंवा गृहप्रमुख 1 हजार मुलीचे शासकीय वसतिगृह, युनिट-4 पद्मपुरा, औरंगाबाद किंवा मोबाइल क्रमांक 9373757287 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा