ज्येष्ठ नागरिक दिन रविवारी(दि.1 ऑक्टों) साजरा करण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – शासन निर्णयानुसार 1 ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये 1 ऑक्टोंबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे.

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतुद आहे. ज्येष्ठ नागरिकाचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा.समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे,  वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण याआधीच जारी केले आहे.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये रविवार दि.1 ऑक्टोंबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे,असे  समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे. यानिमित्त पदयात्रा, प्रभातफेरी, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थाचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिरे, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत,असेही त्यांनी कळविले आहे.

 00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा