माहिती अधिकारात अर्जदाराने मागितलेली माहिती नेमकेपणाने द्यावी - अभया शेलकर
छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका)- शासकीय कामकाज पार पडत
असताना जनमाहिती अधिकारी आणि सहायक जनमाहिती अधिकारी तसेच अपिलीय जन माहिती
अधिकारी यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती, अभिलेख
नेमकेपणाने उपलब्ध करुन द्यावेत. असे मार्गदर्शनपर व्याख्यानात ॲङ अभया शेलकर
यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना निमित्त विशेष व्याखानाचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माहिती अधिकाराचे अंमलबजावणी करत असताना. विविध
नियमांचा पालन करुन वेळेच्या मर्यादेत माहिती उपलब्ध करुन द्यावी. कलम 8 प्रमाणे
कोणती माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने देऊ नये. तसेच काय खबरदारी घ्यावी. उदाहरणासह
मार्गदर्शन केले. माहिती उपलब्ध करुन देताना अर्जदारांची ओळखीचा पुरावा म्हणून
कोणकोणती कागदपत्रे तपासवी याबाबत ही त्यांनी सांगितले. या माहिती अधिकार
व्याख्याने साठी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000




Comments
Post a Comment