जिल्हा परिषदेच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा अनूसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील लाभर्थ्यांनी अर्ज करावेत

 


   छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20 टक्के उपकरातुन सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागसवर्गींयाना वैयक्तिक व सामुहिक लाभ देणे करीता ग्रामीण क्षेत्रातील लाथर्थ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. सदर योजनांचे पात्र लाभर्थ्यांकडून 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र मागासवर्गीय लाभर्थ्यांनी संबंधित पंचायत समितीशी मुदत कालावधीत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे.

जिल्हा परिषेद शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनीना सायकल वाटप, मागासवर्गीयांना इलेक्ट्रिक मोटार संच पुरविणे, मागासवर्गीयांना ऑईल, इंजिन, केरोसिन पंप पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्र पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणे, मागासवर्गीय महिला लाभर्थ्यांना झेरॉक्स मशिन पुरविणे, मागासवर्गीय लाभर्थ्यांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीय लोखंडी स्टील पुरविणे (गवती छप्पन बदलुन टिनपत्रे पुरविणे) मागासवर्गीय लाभर्थ्यांना संगणक लॅपटॉप पुरविणे, मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र (पल्वलायझर) पुरविणे, मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशिन पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलच संच पुरविणे, मागासवर्गीयाना दुग्धव्यवसायासाठी गाय, म्हैस पुरवठा करण्याकरीता रु.40 हजार इतके अर्थसहाय्य देणे. मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवठा करण्याकरीता रु.25 हजार इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा