जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘गाथा मुक्ति संग्रामाची’ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण
मराठवाड्यात करण्यात येत आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मराठवाड्यातील सर्व
तालुक्यात “गाथा मुक्ति संग्रामाची”
या
नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे.
दि.27 सप्टेंबर 2023 बुधवारी
सायं.6.30 वा. बचत भवन, पंचायत समिती सभागृह, सोयगाव समन्वयक रामेश्वर देवरे मो.
7798527273 येथे सादरीकरण होणार आहे. तसेच दि. 29 सप्टेंबर शुक्रवारी सायं. 6.30
वा. छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह, नगर परिषद, सिल्लोड येथे प्रयोग होईल.
यासाठी समन्वयक प्रितेश जोशी मो. 9834522812, दि.30 सप्टेंबर शनिवारी, पंडीत गोविंदराव
जळगावकर नाट्यगृह ता.अंबड जि.जालना येथे गाथा मुक्ति संग्रामाची नाटय प्रयोग होइल.
समन्वयक अभिनय जाधव असून मो.नं. 9527992255 आहे.
नागरिकांनी या नाट्यप्रयोगास
उपस्थित राहून मुक्तिसंग्रामाचा इतिहास नाट्यस्वरुपात अनुभवावा असे आवाहन जिल्हा
प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment