वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता

 छत्रपती संभाजीनगर,दि.21(जिमाका)- समाजकल्याण विभागातर्फे मुलींसाठी वसतीगृह चालविले जाते. त्यासाठी महानगरपालिका हद्दीत  भाडेतत्वावर सुसज्य व वातानुकुलीत सोयी-सुविधायुक्त इमारतीची आवश्यकता आहे,असे सहाय्यक आयुक्त डी.एच. राजमोड यांनी कळविले आहे.

पदमपुरा येथे 250 विद्यार्थींनीसाठी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जुने छत्रपती संभाजीनगर 75 विद्यार्थिनींसाठी  वसतीगृहाकरीता,गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह नवीन छत्रपती संभाजीनगर 100 विद्यार्थिनींकरीता जागेची आवश्यकता आहे. महानगरपालिका हद्दीत पाण्याची, लाईट ची व्यवस्था, शहरातील महाविद्यालयास जाणे-येण्याचा मार्ग असलेली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारती भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. अशी इमारत उपलब्ध्‍ असलेल्या मालकांनी इमारतीच्या कागदपत्रासह सर्व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डी.एच.राजमोडे समाज कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा