मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिद्ध

 


छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 104- सिल्लोड, 105- कन्नड, 106- फुलंब्री, 107- छत्रपती संभाजीनगर मध्य, 108- छत्रपती संभाजीनगर (पश्चिम), 109- छत्रपती संभाजीनगर (पूर्व), 110-पैठण,111-गंगापूर,112-वैजापूर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यात आली आहे.

मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राच्या बाबतीत मतदान केंद्राचे विभाजन करुन अथवा मतदार इतर मतदान केंद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झाले आहे.

मतदान केंद्रांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दि.22 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदान केंद्राच्या प्रारुप यादीच्या बाबतीत कोणाचेही कोणतेही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत  सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हानिवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा