राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी  अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

सन-2023-24 साठी विविध समान असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडुन विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.त्यासंदर्भातील नियम,अटी अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.

सन 2023-24 साठीच्या समान निधी योजना पुढील प्रमाणे आहेत.(Matching Schemes)

1)इमारत बांधकाम विस्तार अर्थसहाय्य योजनारु.25.00 लाख.

टिप:- उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे  प्रस्ताव सादर करु नयेत.

सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत.(Non Matching Scheme)

1) ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ,साधनसामग्री,फर्निचर,इमारत बांधकाम विस्तार यासाठी अर्थसहाय्य - (फर्निचर खरेदी रु.4.00 लाख इमारत बांधकाम रु.10 ते 15.00 लाख)

2) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान "ज्ञानकोपरा" विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य - (रु.2.50 लाख) विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (रु.2.00 लाख.)

3)     महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य - (6.20लाख/ इमारत विस्तार रु.10.00 लाख.)

4) राष्ट्रस्तरीय चर्चासत्र,कार्यशाळा,प्रशिक्षण वर्ग जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रू.1.50 लाख/रु.2.50 लाख/रु.3.00 लाख.)

5)बाल ग्रंथालय राजा राममोहन रॉय ग्रंथालय "बाल कोपरा स्थापन" करण्याकरीता अर्थसहाय्य (6.80 लाख.)

अर्ज करण्यासाठी संपर्क साधावा

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे.आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.30/11/2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन श्री दत्तात्रेय .क्षीरसागर,ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगरभवन,मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा