एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे थेट रोख लाभासाठी ७ नोव्हेंबर रोजी स्वस्त धान्य दुकानात शिबिर
छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- जिल्ह्यातील एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातील रास्त भाव दुकानाचे ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरास शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल, केशरी
शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासुन अन्नधान्याऐवजी प्रतिमाह
प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रोख रक्कम (Direct Benefit Transfer-DBT) थेट खात्यात
हस्तांतरीत केली जाते.त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एपीएल, केशरी
शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी प्रत्येक
तालुक्यातील रास्त भाव दुकानाचे ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी
संबंधित एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरीऱ्यांनी विहित नमुन्यात आपले अर्ज करावे. कुटुंबातील
सर्व सदस्यांचे आधार कार्ड,कुटुंबातील महिला सदस्याचे बॅंक खाते असलेल्या पासबुकाच्या
पहिल्या पानाची प्रत जोडावे.
ही मोहिम एक दिवसाची असल्याने तात्काळ
अर्ज दाखल करून DBT द्वारे मिळण्याच्या रकमेचा लाभ घ्यावा. या योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास
तहसिल कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा
अधिकारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment