शासनाची आरोग्य विषयक माहिती आता समाज माध्यमांवर

 छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे यांनी आरोग्य विषयक माहिती युट्युब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या माहितीचा जनतेने लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

आपले कुटूंब, समाज यांचे आरोग्य स्वस्थ रहावे म्हणून जनतेस विविध आजार, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय,  आरोग्याच्या विविध योजना, मोहिमा यांची अधिकृत माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क कार्यालय, पुणे यांच्यावतीने समाजमाध्यमांवर देण्यात आली आहे. या समाजमाध्यमांवर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी डॉ. शकील अहेमद यांनी केले आहे.

https://youtube.com/@MahaHealthIEC

https://twitter.com/MahaHealthIEC?t=Wtvk6EFx5ufAmgETsSBgQ&s=09

https://instagram.com/mahahealthiec?igshid=YmMyMTA2M2Y=

https://www.faceboo.com/MahaArogyaIECBureau?mibextid=ZbWKwl

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा