सोमवारी (दि.६ नोव्हें.) लोकशाही दिन

 छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात येत्या सोमवारी म्हणजेच दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा.  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले अर्ज दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे.  तक्रार अर्ज दाखल करतांना अर्ज हा विहीत नमुन्यात असावा. तकार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाची पोहच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनात  न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व, अपिल, सेवा विषयक बाबी, लोकशाही दिनात यापूर्वी केलेले अर्ज हे स्विकारले जाणार नाहीत. तरी नागरिकांनी आपले तक्रारी अर्ज स्वतः उपस्थित राहून दाखल करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा