साखरेचा साठा घोषित करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, चेन किरकोळ विक्रेते, साखर प्रक्रिया करणारे इ. साठा आपल्याकडील साखर साठा घोषित करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे की, सर्व संबंधित साखर व्यापाऱ्यांनी  त्यांच्याकडील साखरेचा साठा https://esugar.nic.in  या संकेतस्थळावर नोंदवावा. तसेच दर सोमवारी साखर साठा अद्यावत करावा,असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा