ग्रामपंचायत निवडणूकः कामगारांना मतदानासाठी तीन तासांची सवलत

 


छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर २८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीकरीता  रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक क्षेत्रात कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना तीन तासांची सवलत देण्यात यावी,असे निर्देश कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी दिले आहेत. रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायं.साडेपाच यावेळात मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तीन तासाची सवलत द्यावी.  ही सवलत खाजगी कंपन्या, आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर इ. ना लागू राहतील,असेही कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा