शासकीय निवासी शाळांच्या विभागीय फुटबॉल स्पर्धा सोमवारी
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- छत्रपती संभाजीनगर विभागातील ११ शासकीय निवासी शाळांमध्ये मुलां-मुलींचे फुटबॉल सामने सोमवार दि.३० रोजी विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांतील १७ वर्ष वयोगटाखालील जिल्हास्तरावर विजयी संघ या विभागीय स्पर्धेत सहभागी होतील. त्यातून दोन विजयी संघांची निवड करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील.या स्पर्धांना क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment