साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा- व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे

 






छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सर्व योजना मातंग समाज घटकातील वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवावी,असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी आज येथे केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना मातंग समाज घटकातील वंचितांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मेळावा आज पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे  आयोजित कार्यक्रमास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  मनिष सांगळे,  महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक के. बी. पवार, सहाय्यक संचालक प्रवीण निंबाळकर, जिल्हा व्यवस्थापक जालना विष्णू सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने उपस्थित होते.

श्री. सागळे म्हणाले की, एन.एस.एफ.डी.सी. योजना सुरु करण्यासाठी महामंडळाने प्रस्ताव पाठविला आहे. ३० लाखापर्यंत आपल्या महामंडळाची योजना लागू करण्याचा प्रयत्न चालु आहे. महामंडळ छोट्या मोठ्या सर्व व्यवसायासाठी लाभर्थ्यांना सहकार्य करेल. युवकांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्यासाठी व उद्योग उभारणीसाठी महामंडळ जोमाने काम करीत आहे. लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या महामंडळाच्या संबंधित असलेल्या १३ शिफारशी लागु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ८% व्याज परतावा करण्यासाठी महामंडळाची पुर्नबांधणी चालु आहे.  राष्ट्रीयकृत बँका बरोबरच सहकारी बँकाना सुद्धा महामंडळाचे प्रस्ताव पाठविण्याचे प्रयत्न सुरु आहे. ५० हजार प्रकल्प मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविण्यात येत आहे. महामंडळाची प्रक्रिया व योजना ऑनलाईन सेवेतून अद्यावत करण्याचे प्रयत्न चालु आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही भरीव वाढ करण्यात येत आहे,असे सांगळे यांनी सांगितले.

प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक के.बी. पवार यांनी, सूत्रसंचालन विशाखा नांदगावकर यांनी केले तर पंचशिलाताई भालेराव यांनी गितगायन सादर केले. कार्यक्रमाला लाभार्थी व विविध सामाजिक कार्यकर्ते , विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा