एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : महाडीबीटी लाभार्थ्यांना पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):-  जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत आहे. महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी पद्धतीने ३३६ लाभार्थ्यांची निवड झालीआहे, तरी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत १४ व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर ३३६ लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेडनेट/हरितगृह - २१, कांदाचाळ – ९२ प्लास्टिक मल्चिंग - १३० याप्रमाणे सोडतीमध्ये निवड झाली आहे. नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि पोर्टलवर कागदपत्रे तत्काळ अपलोड करून घ्यावीत. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांची विविध घटकाकरिता निवड झालेली असुन सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा