जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (दि.४ डिसेंबर)
छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जातो.डिसेंबर महिन्यात येत्या सोमवारी म्हणजेच दि.४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले अर्ज वेळेत दाखल करावे. तक्रार अर्ज दाखल करतांना अर्ज हा विहीत नमुन्यात असावा. तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाची पोहच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व, अपिल, सेवा विषयक बाबी, लोकशाही दिनात यापूर्वी केलेले अर्ज हे स्विकारले जाणार नाहीत. तरी नागरिकांनी आपले तक्रारी अर्ज स्वतः उपस्थित राहून दाखल करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment