लोकशाही दिन सोमवारी (दि.१ जानेवारी)

      छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिन  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी  आयोजित करण्यात येतो.  जानेवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. १जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १२ वा. होणार आहे. लोकशाही दिनासाठी लोकांचे अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात स्विकारण्यात येतील. नागरिकांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यानंतर दोन प्रतित तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या अर्जाची पोहोच पावतीही  सोबत जोडावी.  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना अर्ज विहित नमुन्यात असावा.  तक्रार-निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. लोकशाही दिनी अर्ज दाखल करतांना न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक बाबी आनि लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज  याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा