हंगाम २०२३-२४ मध्ये नाफेडच्या वतीने तुर खरेदी; शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका) - हंगाम २०२३-२४ मध्ये नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत बाजाराभावाने तुर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी केले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी करण्यासाठी या जिल्ह्यात जाधववाडी,छत्रपती संभाजीनगर व गंगापूर येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या खरेदी केंद्रावरच तुर ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही नोंदणी बुधवार दि.१३ पासून सुरु आहे. या केंद्रांवर जाऊन तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.के.पांडव यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment