साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

 छत्रपती संभाजीनगर दि. १५(जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग अंतर्गत १२ पोट जातीतील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी ३० लाख रुपये तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख रुपये इतके शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथील जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एन. एस. एफ. डी. सी. दिल्ली महामंडळामार्फत येत असलेल्या शैक्षणिक कर्ज योजना सन २०२३-२४ पुर्ववत सुरु झाली आहे. या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाख रुपये  व परदेशांतर्गत शिक्षणासाठी ४० लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एन.एस.एफ.डी.सी. कडून उपलब्ध करुन देण्यात येतो. देशांतर्गत व परदेशांतर्गत शिक्षणासाठी तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज दर व परतफेडः-

देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर महिला लाभार्थ्यांसाठी ५.५  टक्के व पुरुष लाभार्थ्यांसाठी ६ टक्के व्याजदर आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी महिला लाभार्थ्यांसाठी ६.५ टक्के व पुरुष लाभार्थ्यांसाठी ७ टक्के व्याजदर आहे.  १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्षाचा व १० लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी १२ वर्षांचा असेल. कर्ज परतफेडीची सुरुवात शिक्षण पुर्ण होऊन ६ महिन्यानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेव्हापासून सुरुवात होईल.

कर्जयोजना लागू असलेले अभ्यासक्रमः-

अभियांत्रिकी (डिप्लोमा,बी. टेक.,बी.ई.,एम. टेक.,एम.ई.), आर्किस्टेक्चर (बी.आर्किस्टेक्चर,एम.आर्किस्टेक्चर), मेडीकल (एम.बी.बी.एस.,एम.डी.,एम.एस.), बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोलॉजी, क्लिनिकल (डिप्लोमा,डिग्री), फार्मसी (बी.फार्मसी,एम.फार्मसी), डेंटल (बी.डी.एस.,एम.डी.एस.), फिजीओथेरपी (बी.एस.सी.,एम.एस.सी.), पॅथोलॉजी (बी. एस.सी.,एम.एस.सी.), नर्सिंग(बी. एस.सी.,एम.एस.सी.), माहिती तंत्रज्ञान (बी.सी.ए.,एम.सी.ए.), व्यवस्थापन (बी.बी.ए./एम.बी.ए.), हॉटेल व्यवस्थापन आणि केटरींग तंत्रज्ञान (डिप्लोमा,पदवी,पदव्युत्तर), विधी (एल.एल.बी., एल.एल.एम), शिक्षण (सी.टी., एन.टी.टी., बी.एड, एम.एड), शारिरीक शिक्षण , पत्रकारीता अभ्यास क्रम  इ. अभ्यासक्रमांसाठी ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

जोडावयाचे कागदपत्रेः- जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तीन लाख रुपये मर्यादा असलेला, शैक्षणिक दाखले, ज्या कॉलेज, विद्यापीठात शिक्षण घेत आहात त्या बाबतचा पुरावा, बोनाफाईड सर्टिफिकेट, कॉलेज, विद्यापीठाची वर्षनिहाय शुल्कबाबत पुरावा. आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो इत्यादी.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा