जिल्ह्यात पशुधनासाठी २२.३८ लक्ष मे.टन चारा उपलब्ध; जिल्हा वार्षिक योजनेतून लागवडीमुळे अतिरिक्त उपलब्धतेचे नियोजन

 





     छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८६१० शेतकऱ्यांना  मका, न्युट्रिफिड बाजरी, शुगर ग्रेज अशा प्रकारच्या चारा पिकाचे  ६० हजार २७० किलो बियाणे दिले आहे. त्यातून ३०१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली असून  त्यामुळे अतिरिक्त १.४१ लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली.

पशुधनाला लागणाऱ्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत आज आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे हे होते.  तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकरी डॉ. सुरेखा माने, उप कार्यकारी अभियंता सिंचन निरंजन मनिष, कृषी तंत्र अधिकारी चिंतलवाड, जलसंधारण अधिकारी शेख आदी उपस्थित होते.

बैठकीत चारा पिकाच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. पिकपेरणी अहवालानुसार जिल्ह्यात विविध स्रोतांद्वारे २२.३८ मेट्रिक टन  चारा उपलब्ध असून  हा चारा पुढील ७-८ महिने पुरेल अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ६ लाख ३३ हजार २ इतके पशुधन असून दररोज ३३२३ मेट्रिक टन; दर महा ९९ हजार ६९८ मेट्रिक टन आणि वर्षाला ११ .९६ लक्ष मेट्रिक टन चारा आवश्यक असतो. सद्यस्थितीत  खरीप हंगामातून  १२.६८ लक्ष मे.टन चारा उत्पादन झाले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ८६१० शेतकऱ्यांना ६० हजार २७० किलो बियाणे वाटप करुन अतिरिक्त चारा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत विविध उत्पन्न स्त्रोताद्वारे जिल्ह्यात २२.३८ लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा