जि.प.कृषी विभागामार्फत अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी अनुदान; लाभ घेण्याचे आवाहन
योजनांची माहिती याप्रमाणे-
१)
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
अनुसूचीत जाती प्रवर्गातील दिड लाख
रुपयांपेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगीक
बाबींचा लाभ दिला जातो.
आवश्यक कागदपत्रेः-सक्षम अधिकाऱ्यांकडून
प्राप्त जात प्रमाणपत्र,नविन विहिरींसाठी स्वत:च्या नावे किंवा सामुहीक ०.४- हे.
जमीन, इतर लाभासाठी ०.२० हे. जमीन.,वार्षीक उत्पन्न दिड लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, सातबारा,
८-अ नमुना,आधार कार्ड, बँक पासबुकच्या सत्यप्रती
मिळणारा लाभः- नविन सिंचन विहीरीसाठी अडीच लाख
रुपये, जुनी विहीर दुरुस्ती साठी ५० हजार रुपये, वीज
जोडणी साठी दहा हजार रुपये, शेत तळे प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी एक लक्ष
रुपये, ठिबक सिंचन संच घेण्यासाठी ५० हजार रुपये, तुषार
सिंचन संचासाठी २५ हजार रुपये, विद्युत पंप संचासाठी २० हजार रुपये, परसबागेसाठी
५०० रुपये या प्रमाणे. अर्जाचा
नमुना https://mahadbtmahait.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी कृषी
पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
२)
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील दिड लाख
रुपयांपेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगीक
बाबींचा लाभ दिला जातो.
आवश्यक कागदपत्रेः-सक्षम अधिकाऱ्यांकडून
प्राप्त जात प्रमाणपत्र,नविन विहिरींसाठी स्वत:च्या नावे किंवा सामुहीक ०.४- हे.
जमीन, इतर लाभासाठी ०.२० हे. जमीन.,वार्षीक उत्पन्न दिड लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, सातबारा,
८-अ नमुना,आधार कार्ड, बँक पासबुकच्या सत्यप्रती.
मिळणारा लाभः- नविन सिंचन विहीरीसाठी
अडीच लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती साठी ५० हजार रुपये, वीज
जोडणी साठी दहा हजार रुपये, शेत तळे प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी एक लक्ष
रुपये, ठिबक सिंचन संच घेण्यासाठी ५० हजार रुपये, तुषार
सिंचन संचासाठी २५ हजार रुपये, विद्युत पंप संचासाठी २० हजार रुपये, परसबागेसाठी
५०० रुपये, पीव्हिसी पाईप साठी ३० हजर रुपये या प्रमाणे. अर्जाचा नमुना https://mahadbtmahait.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी कृषी
पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती
संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment