सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधील खेळाडुंच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आज

      छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)-  समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन  विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार दि.28 रोजी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास  करणे, त्यांनासदृढ व सक्षम नागरिक बनविणे, त्यांच्यातील क्रीडा नैपुण्य विकसित करण्यासाठी हे आयोजन केले जाते.

 यंदाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 100 मी.धावणे,200 मी.धावणे,400मी.धावणे,रीले 4X100 मी.लांब उडी,थाळीफेक,रस्सीखेच व खो-खो,कबडी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर विभागातील 11 शासकीय निवासी शाळांमध्ये मुलां-मुलींचे विविध क्रीडा प्रकाराचे सामने  गुरुवार दि.28 छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार आहेत.  यामध्ये जास्तीत जास्त 500 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातील विजयी संघांची निवड करुन त्यांना  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली.

या स्पर्धांमध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी यांचे अधिनस्त शासकीय निवासी शाळांतील  14 वर्षे व 17 वर्ष वयोगटाखालील जिल्हास्तरावर निवड झालेल्या संघांमध्ये या स्पर्धा होणार आहेत.  यातील विजेते राज्यस्तरीय स्पर्धेत विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक , छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.या स्पर्धांना उपस्थित राहून लावून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा