राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम;व्हिटीरोरेटिनल सर्जन करार पद्धतीने नेमणूकीसाठी अर्ज मागविले

      छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाअंतर्गत  जिल्हा रुग्णालयात व्हिटीरोरेटिनल सर्जरी करण्यासाठी व्हिटीरोरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. त्यासाठी एमएस/डीएनबी (ऑप्थाल्मॉलॉजी) शैक्षणिक अर्हता असणाऱ्या शल्यचिकित्सकासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  त्यांना प्रति शस्त्रक्रिया १० हजार रुपये या प्रमाणे  शुल्क अदा केले जाईल. तरी इच्छुक व्हिटीरोरेटिनल शल्यचिकित्सकाने दि.२८ डिसेंबर पर्यंत अर्ज करावा. सोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र, १०० रुपयांचा बॉण्ड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयास सादर करावा,असे जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा