क्षयरोग मुक्त भारत अभियान; लासूर येथे ५० दत्तक रुग्णांना पोषक आहार किट वाटप

      छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानअंतर्गत मराठवाडा ग्रामिण विकास संस्थेने  लासूर येथे ५० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पौष्टिक अन्नाचे किट दिले. लासूर स्टेशन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात गुरुवारी (दि.२८) हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते राजपूत, श्रीमती अन्नपूर्णा आदी उपस्थित होते. उपस्थित तज्ज्ञांनी रुग्णांना आहार व नियमित औषधोपचाराबद्दल मार्गदर्शन केले.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा