साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने दि.९ रोजी निवड

      छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  विकास महामंडळ (मर्या.) मार्फत राबविल्या जानाऱ्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत प्राप्त अर्जांपैकी पात्र प्रकरणांमधून लाभार्थ्यांची निवड मंगळवार दि.९ जानेवारी २०२४ रोजी दु.१२ वा. करण्यात येणार आहे. अर्जदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.  लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष  तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे.  पात्र अर्जांची यादी महामंडळाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. अर्जदारांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा