गावनिहाय पाझर तलाव, तलाव, नाले इ. जलस्रोतांची माहिती कळवा-डॉ.अरविंद लोखंडे
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसेवकामार्फत आपापल्या गावातील जलस्रोत, तलाव, पाझर तलाव, नाले, नदी इ. विषयी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अथवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या कार्यालयास कळवावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.
राज्यात राबविण्यात
येत असलेल्या जलयुक्त शिवार टप्पा २ व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांच्या
अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश
देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजय शिंदे,
कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे घुगे आदी उपस्थित होते. या बैठकीत दिलेल्या
निर्देशानुसार जिल्ह्यात गाळ उपलब्ध असणारे नाले, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे
बंधारे, तलाव आदी स्रोतांबद्दल ग्रामसेवकांमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी
अधिकारी ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात पाठवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment