महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा रविवारी (दि.२८)
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि.२८ रोजी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन परीक्षा केंद्रांवर ६२४ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी ८८ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळात होणार आहे.
परीक्षा केंद्र याप्रमाणे-
१. एमजीएम पॉलिटेकनिक महाविद्यालय, एन ६, सिडको,
सेंट्रल नाक्याजवळ, छत्रपती संभाजीनगर-४३१००३ येथे २८८ परीक्षाथी.
२. एमजीएम जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालय,
एन ६, सिडको, छत्रपती संभाजीनगर-४३१००३ येथे ३३६ परीक्षार्थी.
परीक्षार्थींसाठी सुचनाः-
परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा
पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड,
स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात
उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत
प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.
तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम
संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे, असेही
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment