पत्रपरिषद: येत्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – डॉ.अरविंद लोखंडे
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर चे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले. अंतिम मतदार यादी प्रकाशनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांचीही यावेळी उपस्थिती होती।
डॉ.
लोखंडे म्हणाले की, मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री
करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी
तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. मतदार यादीत नांव तपासणी साठी Voter Help Line App किंवा https://voters.eci.gov.in/
या संकेतस्थळाचा वापर करता येतो.
आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र
क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का
याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरुस्त्या
करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. ८ भरावा.
दिनांक २३.०१.२०२४ पासून निरंतर मतदार नोंदणी सुरू होणार असल्याने या कार्यक्रमांतर्गत
नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे, त्याप्रमाणे
एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत
दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा
नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य
आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार
याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.
मागील
०५.०१.२०२३ रोजी प्रसिध्द झालेले मतदार यादीत Gender
Ratio ८९८ होता Gender Ratio वाढवण्यासाठी
महिला बचत गट यांच्या मदतीने महिलांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली व महिला
मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली त्यामुळे दिनांक २३.०१.२०२४ रोजी प्रसिध्द
झालेली मतदार यादीत Gender Ratio ९०६ इतकी वाढ झाली आहे. Gender
Ratio मध्ये प्रती हजार ८ ने वाढ झाली आहे.
तृतीयपंथी
व्यक्ती, यांच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात
आली होती. दिनांक २७.१०.२०२३ रोजी प्रारुप मतदार यादी मध्ये तृतीयपंथी व्यक्ती
मतदार संख्या १०१ होती. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी मध्ये तृतीयपंथी व्यक्ती
संख्या १३३ इतकी आहे. तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत ३२ ने वाढ झाली आहे.
ग्राम
विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने ०१.११.२०२३ ते ०७.११.२०२३ या
कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या काळात
ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात आले. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस
पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात
कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी करण्यात आली. तसेच
दुबार नावे, मृत व्यक्ती, स्थलांतरित
झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या
स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी करण्यात आली.
मागील
दि. ०५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५,३४,७००, स्त्री मतदार १३,७८,४३७, तृतीयपंथी
मतदार ९१ असे एकूण मतदारसंख्या २९,१३,२२८ इतकी होती. दिनांक
२७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत पुरुष मतदार १५,४९,३३५, स्त्री मतदार १३,९५,७७५ व तृतीयपंथी मतदार १०१ असे एकूण
मतदारसंख्या २९,४५,२११
इतकी होती. दि. २३ जानेवारी २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५,७०,७३९, स्त्री
मतदार १४,२२,५३१
व तृतीयपंथी मतदार १३३ असे एकूण मतदारसंख्या २९,९३,४०३
इतकी आहे. त्यामध्ये १२०६६० इतकी नवीन मतदार नोंदणी झाले, तर ६३२०७ एवढ्या
मतदारांची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मयत, कायमस्वरूपी
स्थलांतरित या मतदारांची होती.
मतदार
यादीत नवमतदार यांची नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील १९४ महाविद्यालयात विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात
२१२२६ नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. दिनांक २७.१०.२०२३ रोजी प्रसिध्द
प्रारुप मतदार यादीत १८-१९ या वयोगटाचे मतदारांची संख्या १०३६० इतकी होती. दिनांक
२३.०१.२०२४ रोजी प्रसिध्द झालेली मतदार यादीत १८-१९ या वयोगटाची मतदार संख्या ३४,१०९
इतकी आहे. या मध्ये २३७४९ मतदारांची वाढ झाली आहे. तर . प्रारुप मतदार
यादीत २०-२९ या वयोगटाचे मतदारांची संख्या ५६५९३७ इतकी होती. दिनांक २३.०१.२०२४
रोजी २० - २९ या वयोगटाची मतदार संख्या ६,०४,८५८ इतकी आहे. या मध्ये ३८९२१
मतदारांची वाढ झाली आहे.
घरोघरी पडताळणी व PSE, DSE च्या माध्यमातून मतदार यादी शुध्द करण्यात आली
आहे. त्यामध्ये घरोघरी पडताळणी मध्ये ३८०४४ दुबार, स्थलांतरीत
व मयत मतदारांचे नांव वगळण्यात आले. तसेच PSE मध्ये ६७०२ व DSE मध्ये २३९७ मतदारांचे
नांव वगळण्यात आले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
आज(दि.२५)
राष्ट्रिय मतदार दिन कार्यक्रम
राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त गुरुवार दि.२५ रोजी जिल्हा प्रशासनातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. मतदानाप्रती मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच मतदार नोंदणी
कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात येणार
आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.
००००००
Comments
Post a Comment