प्रजासत्ताक दिनःमुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज (दि.२६) पालकमंत्र्यांच्या हस्ते
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):- प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. देवगिरी मैदान येथे होणार आहे. राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या शुभ हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते,शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले आहे.
मुख्य शासकिय
सोहळ्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी ध्वजारोहणाचे कोणतेही शासकीय,
अर्धशासकीय समारंभ सकाळी साडेआठ ते १० वा. दरम्यान आयोजित करु नये. अशा संस्थांनी ध्वजारोहणाचे
कार्यक्रम सकाळी साडेआठ वा. पूर्वी किंवा
१० वा. नंतर आयोजित करावे असे उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment