शासकीय कर्मचाऱ्यांचा माहिती कोष; माहिती अद्यावत करण्याचे आवाहन

   छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडुन महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहिती कोषासाठी जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातील कर्मचअऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करावी,असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी केले आहे.

या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययीआस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि. ०१ जुलै २०२३ या संदर्भ दिनांकास अनुसरून गोळा करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वकष माहितीकोष २०२३ ऑनलाईन नोंदणी केलेली माहिती संगणकीय आज्ञावली https://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर EMDb-२०२३ या नावाने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये नोंदणी केलेली माहिती चे वैधतीकरण दि. ०१/०१/२०२४ ते २८/०२/२०२४ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे कडून दिले जाणारे माहितीचे वैधतीकरण केल्याचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०२४ (पेड इन मार्च) च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा सदर वेतन देयके कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालयांकडून पारीत केले जाणार नाहीत. शासन परिपत्रकाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करुन शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा