महासंस्कृती महोत्सव नियोजनासाठी आज (दि.२५) कलावंतांची बैठक

            छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जिल्हास्तरावर महासंस्कृती हा महोत्सव आयोजित करावयाचा असून या आयोजनासाठी गुरुवार


दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित बैठकीस कलावंतांनी उपस्थित रहावे,असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीने नियोजन करावयाचे आहे. महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शक विविध  कार्यक्रम,लोककलांचे सादरीकरण , पोवाडा, भरुड, गोंधळ इ. लोककलाप्रकारंना चालना देणारे कार्यक्रम समाविष्ट असणार आहेत. या महोत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी  जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंत, रंगकर्मी, दिग्दर्शक, नाटककार, संगितकार, गायक, वादक, नर्तक इ. क्षेत्रातील मान्यवरांनी , जाणकार व्यक्तिंनी गुरुवार दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा