विशेष लेख- महिला व बालविकास विभागाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ अथवा ज्या बालकांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशा बालकांचे संगोपन करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविली जाते. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा,असे आवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केली आहे.
योजनेचे स्वरुप - या योजनेअंतर्गत दि.१ एप्रिल २०२३ पासुन २२५० रुपये प्रति बालक प्रति महिना लाभ दिला
जातो. हा लाभ बालकाच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत देण्यात येतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच तालुकास्तरावर संरक्षण
अधिकारी (कनिष्ठ), अभय केंद्र, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे
करावा.
लाभार्थी निकषः-
१) अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक घेणे
शक्य होत नाही, अशी बालके,
२) एक पालक असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत
मातृत्व, गंभीर अजार,
पालक रुग्नालयात असणे इ. कारणामुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या
कुटूंबातील बालके,
कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयांची बालके, एच.
आय. व्ही. ग्रस्त / बाधित बालके, तीव्र
मतिमंद बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके.
३) पालकांमधीत तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन
किंवा पोलीस तक्रार प्रकरणात
अशी अपवादात्मक परिस्थीतील बालके
४) शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)
सोबत
जोडावयाची कागदपत्रेः-
१) आधार काडे (पालकाचे व बालकाचे)
२) निवासाचा पुरावा - रेशन कार्ड/लाईटबील/पाणी पट्टी/घरपट्टी पावती/नगरपालीकेचा
/ नगरसेवकाचा रहिवासी
दाखला यापैकी एक
३) उत्पन्नाचा दाखला चालु वर्षाचा - तहसिलदार यांचा दाखला / पगार पत्रक
/ पालकाच्या कार्यालयाचा दाखला
(पालकाचे पद लिहावे)
४) बालकाचा जन्माचे दाखला
५) शाळेत प्रवेश घेतल्याबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट्स ओरिजनल (चालु
वर्षाचा दयावा)
६) राष्ट्रीयकृत बॉकेचे पासबुक (पालकाचे/बालकाचे )
७) पालकासमवेत मुलांचा घरासमोर काढलेला फोटो (04 प्रती 4X6)
८) मृत्यु प्रमाणपत्र (बालकाच्या आई किंवा वडीलाचे अथवा दोन्ही )
९) बंदी असल्यास शिक्षा भोगत असल्याचे पत्र / प्रमाणपत्र
१०) इतर कागदपत्रे (समिती / कार्यालयाने सूचविल्यानुसार)
११) दुर्धर अजार, अपंग, मतिमंद, असल्यास दवाखान्याचे प्रमाणपत्र आणि
घटस्पोटीत असल्याचे कोर्टाचे आदेश.
गरजू व इच्छुकांपर्यंत माहिती पोहोचवून लाभ घेण्यासाठी अर्ज करावा,
असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment