स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४; मॅरेथॉन स्पर्धा, ग्रामसभेचे आयोजन

            छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत  ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४’ राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी पुण्यतिथी दि.३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी  दरम्यान कुष्ठरोग पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.  त्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेतून जनजागृती

स्पर्श या कुष्ठरोग जनजागृती अभियानानिमित्त प्रजासत्ताक दिन दि.२६ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत ध्वजारोहणानंतर आयोजित ग्रामसभेत जिल्हाधिकारी महोदयांच्या घोषणापत्राचे वाचन,सरपंच, कुष्ठरोग निर्मूलनाबाबत शपथ, कुष्ठरुग्णाचे मनोगत. पथनाट्य आदी विविध उपक्रमाद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धा

स्पर्श या कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात  सकाळी ७ वा. विभागीय क्रीडा संकूल ते गजानन महाराज मंदिर, गारखेडा चौक व परत विभागीय क्रीडा संकूल अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्याना पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत.  इच्छुक स्पर्धकाने आधार कार्ड व बॅंक पासबुकाची छायांकीत प्रत सोबत आणावी असे आवाहन सहायक संचालक डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी केले आहे.

दरम्यान कुष्ठरोग जनजागृती अभियाना दरम्यान पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय  बैठकीत जिल्ह्यातील सहायक संचालक डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सह संचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, डॉ. आडकेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा