प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या प्राधिकार पत्रांसाठीची शिफारस ४ एप्रिल पर्यंत आयोगाकडे पोहोचणे आवश्यक

 छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान व मतमोजणीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना द्यावयाच्या प्राधिकार पत्रांसाठीची निवडणूक आयोगाकडे शिफारस पोहोचण्यासाठी गुरुवार दि. ४ एप्रिल २०२४ अंतिम दिनांक देण्यात आला आहे. त्यापूर्वी ते जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय माहिती कार्यालये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अशा तीन पातळ्यांवरुन आयोगाकडे छाननी करुन आयोगाकडे पाठविले जाणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक भारत निवडणूक आयोगाने दिनांक १६ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामधील लोकसभेच्या ४८ जागांकरिता टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.सदर निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान दिनांक ९ एप्रिल, २०२४ (शुक्रवार), दुसऱ्या टप्प्याचे मतदान दिनांक २६ एप्रिल, २०२४ (शुक्रवार), तिसऱ्या टप्प्याचे मतदान दिनांक ०७ मे, २०२४ (मंगळवार), चौथ्या टप्प्याचे मतदान दिनांक १३ मे, २०२४ (सोमवार) आणि पाचव्या टप्प्याचे मतदान दिनांक २० मे, २०२४ (सोमवार) रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी दिनांक ०४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी होणार आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान / मतमोजणीचे वृत्तसंकलन / छायाचित्रण करण्याकरीता विविध प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छूक प्रतिनिधींच्या नावांची शिफारस भारत निवडणूक आयोगाकडे पोहचण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२४ असा आहे. या शिफारशी महासंचालक, माहिती जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ०४ एप्रिल, २०२४ पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाचा आहेत. प्रसिध्दी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह २ प्रतीसह (मतदान/ मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास प्रतीसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे दिनांक ०४ एप्रिल, २०२४ पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच दिनांक ०४ एप्रिल, २०२४ नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी. महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा