चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- परिवहनेतर चारचाकी वाहनांसाठी सुरु असलेली MH 20 GQ ही नोंदणी क्रमांक मालिका आता संपुष्टात येत असून नवीन MH20GV ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील MH20GV 0001 ते 9999 ही मालिका दि.४ एप्रिल पासुन सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतून आपल्या वाहनांसाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल तर इच्छुक वाहनधारकांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज, आकर्षक क्रमांकाला लागू असलेले शुल्क रकमेचा धनाकर्ष (प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे), ओळखपत्राच्या साक्षांकीत प्रति सह दि. ४अ एप्रिल पर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत खिडकी क्रमांक २१ वर जमा करावे. आकर्षक क्रमांकाचे वाटप हे महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्याट येईल. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांनी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात मुळ शुल्का व्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोंदणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल, असे सहा. प्राडेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment