प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक बैठका, प्रचार सभा, प्रचार फेरी इ. कार्यक्रम आयोजित होत असतात. अशा वेळी स्थानिकस्तरावर परवानगी देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शाखांचे प्रभारी अधिकरी, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त , सर्व पोलीस उपायुक्त यांना अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी निर्गमित केले आहेत. अधिकार प्रदान करण्याचा कालावधी दि.१० जून २०२४ पर्यंत अंमलात राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment