‘सिमी’संघटना बेकायदेशीर घोषित; कारवाईसाठी अधिकार वापराची मुभा

 छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- केंद्रशासनाने एका अधिसुचनेद्वारे स्टुडंटस इस्लामिक  मुव्हमेंट ऑफ इंडीया (सिमी) या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे.याबाबत दि. २९ जानेवारी २०२४ रोजी केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक  एस.ओ. ३५४ अन्वये  बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम १९६७ च्या कलम ३ च्या उपकलम (१) द्वारे घोषित केले आहे.  तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम  १९६७ च्या कलम ४२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करतांना केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक एस. ओ. ४७५ (ई) दि.५ फेब्रुवारी २०२४ अन्वये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम ७ आणि ८ अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणार अधिकार वापरतील, असे निर्देश दिले आहेत, असे अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा