उमेदवारांच्या खर्च नोंदवहीच्या तपासणीचे वेळापत्रक

 छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत प्रचाराच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची किमान तीन वेळा तपासणी केली जाते. भारत निवडणूक आयोगाने नेमलेले खर्च निरीक्षक ही पडताळणी करतील. १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठीचे वेळापत्रक खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी दिले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार, शुक्रवार दि.३ मे, मंगळवार दि.७ मे व शनिवार दि.११ मे असे तीन दिवस सकाळी १० वाजेपासून समिती सभागृह, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ही तपासणी होणार आहे. खर्च तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांचे खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे. सोबत येतांना खर्चाची नोंदवही ( पांधरा, लाल, पिवळा या तीन रंगांचे पृष्ठ असलेली) नमुना १४, खर्चाची मुळ प्रमाणके, निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी बॅंकेत उघडलेले स्वतंत्र बॅंक खात्याच्या पासबुकची प्रत व मागील दिवसापर्यंतचे बॅंक स्टेटमेंट, विविध परवानगीची पत्रे, अन्य कागदपत्रे (असल्यास) सोबत घेऊन यावी,असे आवाहन नोडल अधिकारी खर्च जिल्हा कक्ष शेखर कुलकर्णी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा