बाल धोरण मसूदाःसुधारणा, हरकती, सुचना मागविल्या

       छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):-महिला व बालविकास विभागातर्फे बालधोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने हा मसूदा तयार केला आहे.  महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ असा हा मसूदा तयार आहे. हा मसूदा शासनाच्या  https://womenchlid.maharashtra.gov.in https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.  प्रस्तावित बालधोरण हे  इंग्रजी व मराठी भाषेत  उपलब्ध असून  त्यात आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा, हरकती तसेच शब्दरचना, व्याकरण इ. संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. या सुचना नागरिकांनी दि.३० जून रोजी सायं. सव्वा सहा वा. पर्यंत  महिला व बालविकास आयुक्तालय, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे  यापत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com  या इ-मेल पत्त्यावर पाठविण्यात यावा असे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा