महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व ‘सारथी’तर्फे ८०० जणांचे संगणक प्रशिक्षण पूर्ण; २०० जणांना नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) व छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सारथी - डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम (CSMS-DEEP) अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील ८०० विद्यार्थ्यांनी विनामूल्य संगणक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्यापैकी २०० हून अधिक जणांना आतापर्यंत नोकरीची नियुक्तीही मिळाली आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक निलेश झाल्टे यांनी दिली.
आज या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर
यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र ज्ञान
महामंडळाच्या केंद्रा मार्फत ‘वीर बाजी पासलकर - संगणक शिकता शिकता कमवा’ या योजनेअंतर्गत
सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ३३०० हून अधिक मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील
विद्यार्थ्यांनी १८ ते ४५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी
छत्रपती संभाजी महाराज सारथी - डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम (CSMS-DEEP) या कोर्ससाठी विनामूल्य प्रवेश घेतला. त्यापैकी आतापर्यंत
८०० विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता
पर्यंत २०० हून अधिक विद्यार्थ्याना या कोर्स अंतर्गत नोकरीची नियुक्ती मिळवून देण्यात आली असल्याची माहिती निलेश
झाल्टे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितली. निवासी उपजिल्हाधिकारी
विनोद खिरोळकर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या डॉ बाली थोरात
यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अरिहंत इन्फोसिसचे विनोद जैन, वर्ल्ड इन्फोटेकचे नितीन
खोसे, एकलव्य कॉम्प्युटर्सचे अमित निकुंभ, श्रावणी इंफोटेकचे भानुदास जाधव,
श्रीराम कॉम्प्युटर्सचे विष्णु परजणे, प्रगती कॉम्प्युटर्सचे गौरव ढमाले आदी
केंद्रचालक तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे
मार्केटिंग सल्लागार हर्षवर्धन शिरसाठ
उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे
मार्केटिंग सल्लागार योगेश उबाळे यांनी आभार
मानले.
०००००



Comments
Post a Comment