पैठण येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर

 छत्रपती संभाजीनगर दि.२१(जिमाका) – कौशल्य रोजगार, उद्योजकता व नवीन नेतृत्व महाराष्ट्र यांच्या विभागातंर्गत पैठण विधानसभा मतदार संघातील छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबीर गुरुवार दि.२० रोजी पिताबंरी मंगल कार्यालय पैठण येथे आयोजित करण्यात आले. उद्घाटन विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १० वी व १२वी उत्तीर्ण व परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी करणे, नविन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.अनिल जाधव, योगेश जोशी, संजय गौरशेटे, दीपक वाकडे,योगेश उगले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी ३५० विद्यार्थी हजर होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाही  समपुदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य एन.एन. आहेरकर, उपप्राचार्य एम.एस.माळी, तसेच अन्य गटनिदेशकांनी परिश्रम घेतले.

०००००

 

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा