१२ वी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुविधा

 छत्रपती संभाजीनगर दि.२१(जिमाका) – इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मुला, मुलींचे वसतीगृह सुरु करण्यात आले असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाचे वेळापत्रक हे सर्व शासकीय वसतिगृह व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण येथे सूचना फलकावर लावण्यात आले आहे. प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून दि.२२ जून ते २५जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन द्यावयचे आहेत. प्रवेश अर्जासोबत महाविद्यालयाचे बोनाफाईड, आधार कार्ड, बँक पासबुक, मागील वर्षाचे गुणपत्रक, मार्कशीट, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दोन फोटो रहिवासी दाखला, इ.आवश्यक कागदपत्रे यांच्या छायांकीत प्रतिसह प्रवेश अर्ज दि.२५ जुलै रोजी सायं. ५ वा.पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी सर्व शासकीय वस्तीगृह सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयास संपर्क साधावा.

१.मुलींचे शासकीय वसतिगृह, बी-५ ज्ञानपीठ कॅम्पस नियर बालभारती रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर, मनिष सरकटे मो.नं.७०३८७२५६०१

२. मुलांचे शासकीय वसतिगृह, श्री.ज्ञानकॉम टेक्नो पार्क गरवारे स्टेडियम समोर सिडको छत्रपती संभाजीनगर, बळीराम विसपुते मो.नं.९४२२७०२७५६

शासकीय वसतिगृहामध्ये जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इमर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थींनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा