होमगार्ड नोंदणी: आज (दि.२७) पासुन ऑनलाईन अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर दि.२६ (जिमाका) – जिल्हा होमगार्ड विभागातील पथक कार्यालयनिहाय रिक्त असलेल्या एकूण ४६६ पदांकरीता नोंदणी प्रक्रिया दि.१६ ऑगस्ट पासून राबविण्यात येणार असून त्यासाठी दि.२७ जुलै पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज, रिक्त पदांची संख्या, नियम, अटी व शर्ती https://www.maharashtracding.gov.in/mahag/emrollmentform.php या संकेतस्थळावर उपलब्धआहे. या भरती साठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment