लोकशाही दिन सोमवारी (दि.५ ऑगस्ट)

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. ऑगस्ट महिन्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन  सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लोकशाही दिनाचे आयोज करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक  व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा