महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी व जागरुकता व्हावी यासाठी महसूल सप्ताह राबविण्यात येतो. यानिमित्त गुरुवार दि.१ ऑगस्ट पासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

कार्यक्रमांचे वेळापत्रक याप्रमाणे-

दि.१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करुन महसूल सप्ताहाचा प्रारंभ करणे. मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजना कामकाज,  दि.२ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दि.३ रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, दि.४ रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, दि.५ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, दि.६ रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा, दि.६ रोजी महसूल संवर्गात कार्यरत  सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी- कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा